’मी श्रीनाथ आहे असं मला वाटतं... अजूनही वाटतं...आतून आम्ही एकच आहोत. कधी मी त्याच्या नावाचा मुखवटा वापरला- कधी त्यानं माझा मुखवटा घालून लोकांना चकवलं!शेजारून एक जीप झर्रकन गेली. अगदी घासून जाईल इतक्या अंतरावरून!‘‘दे आर आऊट टु किल अस..’’ श्रीनाथच्या स्वरात घबराट होती.दे आर आऊट टु किल अस! - नियतीचा हा शेवटचा डाव आहे का- आम्ही दोघांनी एकत्र मरावं असा? ओरिजिनल आणि डुप्लिकेट या दोघांनाही, त्यांच्या प्रियतमेसह नष्ट करावं, असा? जीप पुन्हा एकदा झर्रकन जवळून गेली... घार जशी झडप घालते आणि नेम चुकला की पुन्हा तयारी करण्यासाठी दूर जाते, तशी पुढं गेली...काय होणार आता? आम्ही तिघं- नियतीच्या हातची खेळणी... कुठल्या प्रवासाला निघालोय? कुठवर -