वौतागलो अगदी. ह्या जगण्यात काही अर्थ नाही' असे म्हणत म्हणत माणूस अगदी अर्थपूर्ण जगत राहतो. हे कोडे आहे तरी काय ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न म्हणजे माधवी देसाई ह्यांच्या ह्या अर्थवाही कथा. त्या नुसत्या अर्थवाहीच असे नाही तर त्यात एक संगी वाचा प्रवाहही आहे. देसाईबाई च्या लेखनाचे एक वौशिष्ट्य आहे, त्यांच्या लिखाणात एक निनाद असतोच असतो. संग्रहाला नाव मिळालेल्या शुक्रचांदणी'कथेत तर संगीताची कोंडी फोडून तिचा शेवट "षडज्'' लावूनच झाला आहे. ही ह्या संग्रहातील पहिली कथा तर शेवटच्या "अधांतर'' कथेत लेखिकेने "पोलिस इन्स्पेक्टर'' होण्याची जिद्द बाळगणार्या तरुणीला पेश केले आहे. कोणत्याही स्त्री स्वातंत्र्याचे बंड म्हणून मात्र नव्हे. ही जिद्दी तरुणी आपण स्वीकारलेल्या कामात इतकी एकरूप होते की सत्य हुडकून काढण्याच्या नादात तिच्या हातून आरोपीचा मृत्यू ओढावतो - ह्या खात्यात जे चालले त्याप्रमाणे तिला त्यातून आपली सहीसलामत सुटका करून घेता आली असती पण ती हेही सत्य लपवीत नाही - होणाऱ्या परिणामाला सामोरी जाते. - "कथां'' बरोबर ह्यात वाचनीयताही आहे.