शेअर बाजाराविषयी सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे. चांगला गुंतवणूकदार होण्यासाठीचं तसंच शेअर बाजाराच्या उगमाविषयीचं विवेचन सुरुवातीला केलं आहे. नंतर शेअर बाजाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या तसेच सट्टेबाजी करणार्या व्यक्तींच्या अनुषंगाने शेअरबाजार हा विषय विस्तृतपणे मांडला आहे. त्या त्या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य होतं, हे सांगताना त्याचे स्वभावविशेष आणि त्याचं खासगी जीवन याकडेही लक्ष वेधलं आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराकडे आकृष्ट करणं, शेअरदलालांना प्रशिक्षण देणं, ही होती चार्ल्स मेरिलची वैशिष्ट्यं. अभ्यासाच्या जोरावर शेअरबाजाराविषयी अचूक भाकितं करणं, ही होती एडसन गोल्डची खासीयत. तर, अशा व्यक्तींच्या माहितीमधून शेअर बाजाराचे विविध पैलू, विविध देशांची चलनं, शेअर बाजाराचा अर्थकारणाशी असलेला संबंध इ. बाबी उलगडतात. आवश्यकतेनुसार कोष्टकं दिली आहेत. शेवटी संदर्भसूची जोडली आहे. शेअर बाजाराविषयीचं साध्या-सोप्या भाषेतील रोचक पुस्तक.
ATUL KAHATE IS A GRADUATE IN STATISTICS & HAS DONE HIS MBA. HE HAS WORKED FOR IN 18 YEARS IN INFORMATION TECHNOLOGY INDUSTRY WHERE HE HAS HANDLED VARIOUS RESPONSIBILITIES AT SYNTEL, AMERICAN EXPRESS, DEUTSCHE BANK, L&T INFOTECH AND ORACLE FINANCIAL SERVICES. HE HAS VARIOUS BESTSELLING MARATHI BOOKS TO HIS CREDIT ON VARIOUS TOPICS SUCH AS HISTORY, ECONOMICS, MEDICINE, INTERNATIONAL POLITICS, SCIENCE, TECHNOLOGY, BIOGRAPHY, AND CRICKET. HE HAS RECEIVED VARIOUS AWARDS FOR HIS CONTRIBUTION IN WRITING. HE IS ALSO A REGULAR CONTRIBUTOR TO MARATHI NEWSPAPERS AND TV CHANNELS.
अतुल कहाते संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत. एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, एल अँड टी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्यूशन्स (आता ओरॅकल) इथे डायरेक्टर पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सिंबायोसिस, तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अभ्यागत व्याख्याता म्हणून एक दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० अशी ७० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यातील अनेक पुस्तकांचा भारतातील तसेच विदेशांतील जवळपास ५० विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. त्यातील दोन पुस्तके चिनी भाषेत अनुवादित झाली आहेत. त्यांच्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या दीड लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यामधील अलीकडची पुस्तके - इम्रान खान, युद्धखोर अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बखर संगणकाची, अंतराळ स्पर्धा. मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार (दोन वेळा), उत्तम ग्रंथ पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार; संगणक क्षेत्रामधील योगदानासाठी इंद्रधनू-महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर आयटी एज्युकेशन अँड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, जीआर फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेखन नियमितपणे सुरू असते. तसेच सर्व मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत स्कोअरर आणि आकडेवारीतज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.