आजच्या आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आम्हास कसे मार्गदर्शक होऊ शकते?....शिवछत्रपतींच्या ‘स्वराज्याचा’ खरा अर्थ कोणता?....शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ काय?....ऐतिहासिक ललित साहित्यिकांपासून इतिहासकारांची कोणती अपेक्षा आहे?... इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करत आहेत. याशिवाय शिवछत्रपतींचे आरमार, त्यांचे मुंबईकर इंग्रजांशी असलेले सबंध, सरसेनापती हंबीरराव मोहिते, शिवछत्रपतींवरील खुनी हल्ला इत्यादी विषयांवरील महितीपूर्ण लेख.