मुकेशचं आयुष्य तसं अगदी सुखासमाधानात चाललं होतं, अचानक एक वादळ उठलं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून गेला... कोण होता तो? मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वत:च्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला. प्रख्यात कन्नड साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या विवेचक लेखणीतून साकारलेली उत्वंकठवर्धक कादंबरी.