विज्ञानकथा ही मानवाला भविष्यकाळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं समाजावर आणि मानवी व्यक्तिगत जीवनावर कोणते परिणाम होऊ शकतील याची पूर्व कल्पना देते. आगामी चित्रपटातील काही दृश्यं दाखवून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना जाणीव करून देणाऱ्या ‘ट्रेलर’चाच हा एक प्रकार असतो. त्याचबरोबर विज्ञानकथा काही प्रमाणात आजच्या जीवनावरही भाष्य करीत असते. या सर्व बाबींची चुणूक ‘स्वप्नचौर्य’ मधे वाचकास वाचायला मिळेल.