हि कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही. किशोरवयीन मुलामुलींना वाचनाची गोडी लागावी हा हेतू समोर ठेऊन मी हे पुस्तक सादर करत आहे.
संदीप काकडे हे एक किशोर कथा, साहस कथा या वर्गातील एक लेखक आहेत. किशोरवयीन मुलांच्या मध्ये ते प्रसिद्ध आहेत. किशोरवयीन मुलांना वाचनाची गोडी लागावी सोबतच मनोरंजन होऊन आपल्या भाषेविषयी आस्था निर्माण व्हावी, हा त्यांचा प्रमुख प्रयत्न असतो. तसेच ते उत्तम कवी सुद्धा आहेत. 'निलू ' या टोपण नावाने त्यांनी खूप कविता प्रसिद्ध केल्या आहेत.
' नीलपरी ' हि त्यांची परीकथा खूप गाजली होती.