तेजगुरू सरश्रींचा एखादाच विचार कित्येकदा ऐकणाऱ्यांची, वाचणाऱ्यांची मनोवृत्ती पूर्णपणे बदलवायला पुरेसा असतो. अत्यंत कमी शब्दांतही वाचकांना वेगळी दिशा मिळते. या विचारांनी प्रेरित होऊन '365 प्रेरणादायी तेजवाक्ये' या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. प्रत्येक दिवसासाठी एक असे एकूण 365 प्रेरणादायक विचार यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या वाक्यांमुळे प्रेरणा मिळून आनंदाचा निर्मळ झरा तुमच्या जीवनात वाहू शकतो. 'बदल, आनंद, राग, तुलना, चारित्र्य, सर्जनशीलता, निर्णय, मैत्री' अशा विविध विषयांवर ही तेजवाक्ये आहेत. थोडक्यात, तुमच्या जीवनातील शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर लागू होतील असे हे तेजविचार आहेत. वाचकांनी प्रत्येक दिवशी एक तेजवाक्य घेऊन त्यावर शक्य तितकं मनन करायचं आहे. शिवाय मननाबरोबरच भाव, विचार, वाणी, क्रिया यांचा एकमेकांशी मेळही घालायचा आहे. त्यानंतर तुमच्या जीवनात किती आश्चर्यकारक परिवर्तन घडेल ते अनुभवा.