Sat Chit Ananda (Marathi): Tumche 60 Prashna Aani 24 Taas

· WOW PUBLISHINGS PVT LTD
2.0
2 reviews
Ebook
200
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

आपला सेल्फी स्वतः काढा, सेल्फच सत्य आहे हे जाणा!
मायारूपी सर्पाचा सामना…

‘आता मला चक्रव्यूहातून म्हणजेच मायेच्या जाळ्यातून बाहेर पडायचं आहे…,’ असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? बालपणापासून आजपर्यंत तुम्ही ज्या धारणांमध्ये जगत आला आहात, त्याच तुमच्या मुलांनादेखील मिळायला हव्यात का? मायेच्या आधीन न होता तिच्यावर मात कशी करता येईल? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवेत.

कारण अध्यात्मातदेखील लोक अनेक प्रश्नांची जुनी उत्तरंच प्रमाण मानून बसले आहेत. जसं,
– गतजन्मातील कर्मांचं फळ आज मिळेल, तर या जीवनातील कर्मांचं फळ पुढच्या जन्मी.
– आजची कर्मं आत्ता कोणताही आनंद देणार नाहीत, पुढच्या जन्मातच याचा लाभ होईल.
– नशिबात असेल तरच आम्हाला आनंद मिळेल. (खरंतर, आनंद हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.)
– ईश्वर – विशेष चेहरा, आभूषण अथवा विशिष्ट पेहराव परिधान करतो. तो काही बाबतीत नाराज होतो, तर कधी खुश होतो.
– मोक्ष- मृत्यूनंतरच प्राप्त होतो.

वरील धारणा प्रमाण मानणारे लोक जुनं ज्ञानही आचरणात आणत नाहीत आणि नवीन ऐकायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था त्रिशंकूप्रमाणे होते. म्हणून ते अपूर्ण ज्ञानाच्या आधारेच जीवन व्यतीत करतात. परंतु आता वेळ आली आहे, योग्य उत्तरं मिळवून अस्सल अध्यात्म, जीवनाचं ध्येय जाणून घेण्याची!

आध्यात्मिक ज्ञानाचा चुकीचा अर्थ लावल्याने मनुष्य त्याच्या जीवनातील दुःख, निराशा आणि अपयश यांचं कारण प्रारब्धात शोधत राहतो. याबाबत तो ज्यांना विचारतो, त्यांनादेखील याची पुरेशी जाण नसते. परंतु असे अज्ञानी लोक अहंकारवश ‘मला माहीत नाही’ हे प्रांजळपणे सांगण्याऐवजी देवी-देवता, कर्म-भाग्य, जीवन-मृत्यू आणि पूर्वजन्म याविषयी कथा सांगून लोकांना भुलवतात.

अशा लोकांनी चुकीची उत्तरं देऊन मनुष्याची विचारशक्तीच नष्ट केली आहे. मात्र आता वेळ आली आहे, प्रस्तुत पुस्तकाचं उद्दिष्ट साध्य करण्याची, आपल्या जीवनातील केवळ 24 तास खर्च करून सत्य जाणण्याची!

 

Ratings and reviews

2.0
2 reviews

About the author

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.