सुगंध नात्यांचा – प्रत्येकालाच हवा असतो नात्यांमध्ये सुसंवाद,
मग तरीही का होतात कुटुंबात वादविवाद
प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना परस्परांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाटत असते. खरंतर प्रेम, विश्वास आणि श्रद्धेच्या पायावरच परिवाररूपी मंदिराचा कळस चकाकत असतो. पण द्वेष, असूया, अविश्वास, गैरसमज, मत्सर आणि परस्परांना समजून न घेण्याची वृत्ती या मंदिराच्या पायालाच सुरुंग लावते. मग सुसंवादाची जागा वाद-विवाद घेतो आणि घराचं घरपण हरवतं. ज्या घरात पाय ठेवताच साक्षात स्वर्गात प्रवेश केल्याचा अनुभव मिळायचा, तेच घर मनाला नरकयातना देऊ लागतं. का हरवतो नात्यांमधला सुगंध? का सैलावते नात्यांची घट्ट वीण? नात्यांमधील जिव्हाळा पुन्हा अनुभवता येईल का? असा कोणता नियम आहे, जो परिवारातील सर्व सदस्यांना विनाअट प्रेम आणि विश्वासाच्या धाग्यात गुंफेल?
होय! प्रस्तुत पुस्तकाच्या रूपात नात्यांची वीण घट्ट करणारा, प्रत्येक नातं खुलवणारा आणि घराला स्वर्ग बनवणारा सोनेरी नियम तुम्हाला गवसणार आहे. हे केवळ पुस्तक नसून आयुष्यातील नातेसंबंध समृद्ध करणारं साक्षात ज्ञानामृतच! या पुस्तकाच्या निमित्ताने, तुम्ही प्रवास कराल वादविवादाकडून सुसंवादाकडे, नकारात्मक भावनेकडून उमेदपूर्ण उत्साहाकडे आणि नात्यांमधील पोकळपणापासून प्रेम, आनंद आणि शांतीकडे!