* केवळ मनुष्यालाच तणाव का येतो, इतर कोणत्याही पशु-पक्ष्यांना, मनुष्यासारखा तणाव का येत नाही?
* केवळ नोकरी करणार्या मनुष्यालाच तणाव येतो का?- तणावाचा सर्वश्रेष्ठ डॉक्टर कोण आणि तो कुठे असेल?
तुमच्या मनात असे अनेक प्रश्न असू शकतील. प्रस्तुत पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे मिळतील. त्याशिवाय तुम्हाला पुढील गोष्टीदेखील जाणून घेता येतील -
* ध्येयप्राप्तीमध्ये तणाव उपयुक्त कसा ठरतो?
* तणावाची लक्षणं कोणती?- तणावमुक्तीचा सर्वांत सोपा उपाय कोणता?
* तणावाच्या तणावातून सुटका कशी करून घ्याल?
* तणावाकडे नव्या द़ृष्टिकोनातून कसं पाहाल?
विश्वास ठेवा, आज तुम्हाला कोणत्याही कारणानं तणाव जाणवत असेल, तर तो तुम्हाला विकासाच्या पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठीच आलेला असतो. त्यामुळे त्रस्त होण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणून आजपासून जेव्हा तुमच्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा तुम्ही विकासाच्या दिशेनं अग्रेसर होत आहात याची खात्री बाळगा.