‘निरंजन’च्या लेखनातला सूक्ष्म विनोद मला फार आवडतो, असं श्री. घाटे यांचे बरेच लेखकमित्र आणि वाचकमित्र म्हणतात.श्री. घाटे यांनी उमेदीच्या काळात ‘मनोहर’मध्ये ‘मेरी गो राऊंड’ हे हलक फुलक, विनोदाची झाक असलेलं सदर चालवलं होतं. याशिवाय ‘वटवट’ नावाच्या विनोदाला वाहिलेल्या मासिकाची बरीच जबाबदारी – विशेषत: पानं भरायची जबाबदारी घाटे यांच्यावर असे. घाटे यांना जवळून ओळखर्यांना घाटे यांच्याकडे असलेल्या विनोदांचा साठा किती मोठा आहे याची कल्पना आहेच; पण त्यांच्या बोलण्यातला मिस्कीलतेचा भावही ते विसरू शकत नाहीत. घाटे यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देणाऱ्या या एकप्रकारे गप्पाच आहेत. ते विज्ञानलेखनाकडे वळले आणि त्यांचं असं हलक फुलक लेखन मागं पडलं. ‘तरुणांनो होशियार’द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचंही दर्शन आजच्या वाचकाला होईलच; पण त्याचा टाइमपासही चांगल्या प्रकारे होईल.
Szórakoztató és szépirodalom