"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता.
त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे.
आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल."
LAWRENCE ANTHONY IS AN ACCLAIMED CONSERVATIONIST & FOUNDER OF THE EARTH ORGANISATION. HE RECEIVED THE UNS EARTH DAY AWARD FOR HIS WORK IN BAGHDAD. HE LIVES IN ZULULAND, SOUTH AFRICA
लॉरेन्स अँथनी हे अतिशय सुप्रसिद्ध वन्यजीवरक्षक आहेत आणि द अर्थ नावाच्या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांच्या बगदादमधील कामाबद्दल त्यांना संयुक्त राष्ट्राचा अर्थ डे पुरस्कार मिळालेला आहे. ते झुलुलँड, दक्षिण आफ्रिका येथे राहतात.
GRAHAM SPENCE IS A JOURNALIST & EDITOR. ORIGINALLY FROM SOUTH AFRICA, HE LIVES IN ENGLAND.
ग्रॅहम स्पेंस हे एक पत्रकार आणि संपादक आहेत. मूळचे दक्षिण आफ्रिकन असले तरी आता ते इंग्लंडमध्ये राहतात. त्या दोघांनी बरोबर ‘बॅबिलॉन्स आर्क: द इन्क्रेडिबल वॉरटाईम रेस्क्यू ऑफ बगदाद झू’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे
IIT MD. IN PRODUCTION ENGINEER FROM DELHI FOR 3 YEARS. TECH. DEGREE OF FOR 11 YEARS HE WORKED IN GENERAL ELECTRIC COMPANY FOR ELEVEN YEARS AND LIVED IN BANGALORE. CURRENTLY, HE HOLDS THE POSITION OF ENGINEERING MANAGER IN THE AVIATION DIVISION OF GENERAL ELECTRIC COMPANY. OTHER INTERESTS - WILDLIFE PHOTOGRAPHY, READING BOOKS ON WILDLIFE, TRAVEL. ORGANIZING AFRICAN WILDLIFE SAFARIS.
शालेय शिक्षण - ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे. पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे न २००१ साली बी.ई. मॅकेनिकल आय.आय.टी. दिल्ली येथून २००४ साली प्रोडक्शन इंजिनिअर या विषयात एम. टेक. ची पदवी. २००४ सालापासून गेली अकरा वषे जनरल इलेक्ट्रिक या कंपनीत कार्यरत आणि बंगलोर येथे वास्तव्य. सध्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या एव्हियेशन (AVIATION) विभागात इंजिनिअरींग मॅनेजर ह्या पदावर. इतर आवडी – वन्यजीव फोटोग्राफी (WILDLIFE PHOTOGRAPHY), वन्यजीवनविषयातील पुस्तके वाचन, प्रवास. आफ्रिकेच्या वन्यजीव सफारींचे आयोजन.