तो आणि ती... हे पुस्तक कशासाठी? तो आणि ती, पती-पत्नी, स्त्री- पुरूष संबंधातील सुंसंवाद जपण्यासाठी ! हे नाजूक नातं - तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्वरुपात बदलण्यासाठी! तुम्हाला जे हवं ते या नात्यातून मिळविण्यासाठी. ती तशी का वागते? हे त्याला समजावं, आणि तो तसाच का? हे तिला उमजावं यासाठी! हे भावकोमल देखणं नातं कसं जपावं, हे तुम्हाला सांगणारं, अंतमुर्ख करणारं, आत्मविकासच्या वाटेवर चालविणारं पुस्तक.