आपण आपलं मत लोकांसमोर योग्य प्रकारे मांडू शकतो का?
आपल्याला सांगितलं, आज तुम्ही एक प्रेजेंटेशन बनवा आणि बॉस व सहकार्यांसमोर ते प्रस्तुत करा…
तुम्ही एक कॉलेज स्टुडंट आहात आणि सर्व विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची माहिती द्यायची आहे…
तुम्हाला एका कार्यक्रमात आभार प्रकट करायचे आहेत, एखादा कार्यक्रम होस्ट करायचा आहे… तेव्हा तुम्ही पूर्ण आत्मविश्वासासह तो सादर करू शकाल का? अशा वेळी तुम्ही काय तयारी कराल?
होय, आज प्रत्येक ठिकाणी अनेक लोकांसमोर आपलं मत मांडताना अधिकतर अशीच परिस्थिती उद्भवते… परंतु अचानक कित्येकदा भीती, अॅन्क्झायटी, नर्वसनेस, स्टेज फियर अशा विविध भावना निर्माण झाल्याने आपण अशा महत्त्वपूर्ण संधी गमावून बसतो.
या सर्व नकारात्मक भावना दूर करण्यासाठी, शिवाय भरपूर आत्मविश्वास जागृत होण्यासाठी प्रस्तुत पुस्तक तुम्हाला साहाय्यक ठरेल. एक उत्तम स्पीकर बनण्यासाठी काय करायला हवं? कसं करावं? याची संपूर्ण माहिती यात दिली आहे. जसं, लोकांसमोर आपली इमेज कशी जायला हवी? स्टेजवर जाण्यापूर्वी काय तयारी करायची? स्टेजवर गेल्यावर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं? याची विस्तृत माहिती येथे स्टेप बाय स्टेप दिली आहे.
तेव्हा या सर्व गोष्टींचा लाभ घेऊन आपल्यातील स्पीकरला जागृत करण्यासाठी, आपली मतं लोकांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण उत्तम वक्ता का बनू नये?
तेजज्ञान फाउंडेशन आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. यासाठी सरश्रींद्वारा एक अनोखी बोधप्रणाली (System for Wisdom) निर्माण झाली आहे. या प्रणालीला आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राद्वारे ISO 9001:2015च्या आवश्यकतेनुसार आणि निकष पडताळून सरळ, व्यावहारिक आणि प्रभावी बनवलं गेलं आहे.
या संस्थेच्या प्रबोधनपद्धतीच्या भिन्न पैलूंना (शिक्षण, निरीक्षण आणि गुणवत्ता) स्वतंत्र गुणवत्ता परीक्षकांद्वारे (Quality Auditors) क्रमबद्ध पद्धतीने पडताळलं गेलं. त्यानंतर या पैलूंना ISO 9001:2015 साठी पात्र समजून या बोधपद्धतीला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.
या फाउंडेशनचे लक्ष्य आहे नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे वाटचाल. सकारात्मक विचारांकडून शुभ विचारांकडे म्हणजे हॅपी थॉट्सकडे प्रगती. शुभ विचारांकडून निर्विचार अवस्थेकडे मार्गक्रमण आणि निर्विचार अवस्थेच्या अंती आत्मसाक्षात्कार प्राप्ती. ‘मी सर्व विचारांपासून मुक्त व्हावे’ हा विचार म्हणजे शुभ विचार (हॅपी थॉट्स). ‘मी प्रत्येक इच्छेपासून मुक्त व्हावे’, अशी इच्छा म्हणजे शुभ इच्छा.
तेजज्ञान म्हणजे ज्ञान व अज्ञान या दोहोंच्या पलीकडचे ज्ञान. पुष्कळ लोक सामान्य ज्ञानाच्या (General Knowledge) माहितीलाच ज्ञान मानतात. परंतु अस्सल ज्ञान आणि नुसती माहिती यांत फार मोठे अंतर आहे. आजमितीला लोक सामान्य ज्ञानाच्या उत्तरांनाच जास्त महत्त्व देतात. अशा ज्ञानाचे विषय म्हणजे कर्म आणि भाग्य, योग आणि प्राणायाम, स्वर्ग आणि नरक इत्यादी. आजच्या युगात सामान्यज्ञान प्राप्त करणारे लोक, शिक्षक मोठ्या प्रमाणावर आहेत; परंतु हे ज्ञान ऐकून जीवनात परिवर्तन घडून येत नाही. असे ज्ञान म्हणजे केवळ बुद्धिविलास आहे किंवा अध्यात्माच्या नावावर चाललेला बुद्धीचा व्यायाम आहे.
सर्व समस्यांवरील उपाय आहे तेजज्ञान. क्रोध, चिंता आणि भय यांपासून मुक्त जीवन म्हणजे तेजज्ञान. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा, सर्वांगीण प्रगतीचा मार्ग आहे तेजज्ञान. तेजज्ञान आपल्या अंतरंगात आहे. येथे या आणि या गोष्टीचा अनुभव घ्या.
आपल्याला असे ज्ञान हवे आहे, की जे सामान्य ज्ञानापलीकडे आहे, जे प्रत्येक समस्येवरील उत्तर आहे, जे प्रत्येक समजुतीपासून, गृहीत धारणांपासून आपल्याला मुक्त करते, ईश्वरी साक्षात्कार घडविते, अंतिम सत्यात स्थापित करते. आता वेळ आली आहे शाब्दिक, सामान्यज्ञानातून बाहेर येऊन तेजज्ञानाचा अनुभव घेण्याची!
आजवर जप-तप, तंत्र-मंत्र, कर्म-भाग्य, ध्यान-ज्ञान, योग-भक्ती असे अनेक मार्ग अध्यात्मात सांगितले आहेत. या सर्व मार्गांनी प्राप्त होणारी अंतिम समज, अंतिम ज्ञान, बोध एकच आहे. अंतिम सत्याच्या शोधकाला, साधकाला शेवटी जी एकच ‘समज’ प्राप्त होते, ती ‘समज’ श्रवणानेसुद्धा प्राप्त होऊ शकते. अशा समजप्राप्तीसाठी श्रवण करणे यालाच तेजज्ञान प्राप्त करणे म्हटले गेले आहे. तेजज्ञानाच्या श्रवणाने सत्याचा साक्षात्कार घडतो, ईश्वरीय अनुभव मिळतो. हेच तेजज्ञान सरश्री महाआसमानी शिबिरात प्रदान करतात.