त्यात अफाट कार्य करण्याची आणि
ते साठवून ठेवण्याचीही क्षमता असते.
इतिहासातील सर्वांत बुद्धिमान मनुष्य कोण? असा प्रश्न निर्माण झाला तर सर्वांचं एकच उत्तर असेल, अल्बर्ट आईन्स्टाईन! वेगवेगळ्या युगांतील लोकांनी त्यांना शताब्दी पुरुष, सर्वकालिन महान शास्त्रज्ञ, जीनियस अशा कितीतरी उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. आईन्स्टाईन यांनी आपल्या सिद्धान्तांद्वारे आणि संशोधनाद्वारे विज्ञानाचा चेहरामोहराच पार बदलून टाकला. अतिशय सामान्य मनुष्यदेखील श्रम, हिंमत आणि ध्यास यांच्या साह्याने अनोखं यश प्राप्त करू शकतो. शिवाय लौकिक मिळवून विश्वातील असामान्य व्यक्तींच्या अग्रगण्य यादीत आपलं नाव समाविष्ट करू शकतो.
सापेक्षता सिद्धान्त आणि E = mc2 या द्रव्यमान ऊर्जा समीकरणामुळे आईन्स्टाईन संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यांना सैद्धान्तिक भौतिकशास्त्रात विशेषतः प्रकाश विद्युत प्रभावाच्या नियमांचा शोध लावल्याबद्दल इ.स. 1921 मध्ये विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा ‘नोबेल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं.
मनुष्य एखादं छोटं काम जरी करत असेल, तरी त्याने ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करायला हवं, असं त्यांचं प्रांजळ मत होतं.
आपणदेखील एका महान, विलक्षण शास्त्रज्ञाच्या जीवनाचं अवलोकन करून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी, त्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं...