‘निसर्गनियम जाणणारे लोक कधीही आत्मप्रशिक्षण घ्यायला घाबरत नाहीत. ते कधीही छोटं ध्येय बाळगत नाहीत.’ या वाक्यातील वास्तव सिद्ध करणं हेच प्रस्तुत पुस्तकाचं ध्येय आहे. खरंतर जीवनात महान ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रत्येकालाच संपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक प्रशिक्षण म्हणजे आपल्यासाठी एक मैलाचा दगडच.
पुढील काही प्रशिक्षणांवर दृष्टिक्षेप टाकू या-
* आउट ऑफ बॉक्स, विचार करण्याचं प्रशिक्षण
* नवीन कला कमीत कमी वेळेत शिकण्याचं प्रशिक्षण
* संघामध्ये आत्मविकासाचं प्रशिक्षण
* विचारशक्ती वृद्धिंगत करण्याचं प्रशिक्षण
* जे प्राप्त केलंय, त्याची योग्य जोपासना करण्याचं प्रशिक्षण
* मोजक्या शब्दात आणि कमी वेळेत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं प्रशिक्षण