The Archer (Marathi)

· Manjul Publishing
5.0
සමාලෝචන 1ක්
ඉ-පොත
158
පිටු
ඇගයීම් සහ සමාලෝචන සත්‍යාපනය කර නැත වැඩිදුර දැන ගන්න

මෙම ඉ-පොත ගැන

द अल्केमिस्ट या पुस्तकाच्या नंबर वन बेस्टसेलिंग लेखकाच्या या प्रेरक कथेमध्ये एक युवक एका वृद्धाकडून शहाणपणाच्या गोष्टी आणि व्यावहारिक धडे शिकतो. या पुस्तकात आपण तेत्सुयाला भेटतो. तेत्सुया, एके काळी धनुर्विद्येमध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेसाठी प्रसिद्ध होते परंतु आता सार्वजनिक जीवनातून ते निवृत्त झाले आहेत. एक मुलगा त्यांना शोधत येतो. त्याच्या मनात कित्येक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देताना तेत्सुया धनुष्याची कार्यपद्धती सांगतात आणि अर्थपूर्ण जीवनाचे सिद्धान्त प्रकट करतात. पाउलो कोएलो यांची ही कथा स्पष्ट करते की, कर्म आणि आत्मा यांच्या मिलाफाशिवाय जगण्याचं समाधान मिळत नाही आणि नाकारले जाण्याच्या किंवा अपयशाच्या भीतीमुळे संकुचित जीवन जगणं योग्य ठरत नाही. याऐवजी मनुष्याने जोखीम उचलली पाहिजे, धाडसी बनलं पाहिजे आणि जीवनाच्या अनपेक्षित यात्रेसाठी तयार राहायला पाहिजे. बुद्धिमत्ता, औदार्य, साधेपणा आणि विनयशीलता या ज्या गुणांनी कोएलो यांना आंतरराष्ट्रीय बेस्टसेलिंग लेखक बनवलं, त्या आधारेच त्यांनी यशस्वी जीवनाची रूपरेषा प्रस्तुत केली आहे : कठोर परिश्रम, उत्साह, उद्देश, विचारसरणी, अपयशाचा स्वीकार आणि जगामध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा.

ඇගයීම් සහ සමාලෝචන

5.0
1 සමාලෝචනයක්

කර්තෘ පිළිබඳ

पाउलो कोएलो यांचं जीवन त्यांच्या पुस्तकांचा मूळ प्रेरणास्रोत आहे. त्यांनी मृत्युचा सामना केला, वेडेपणाचं टोक गाठलं, मादक पदार्थांचं सेवन केलं, यातना झेलल्या, जादूचे आणि हातचलाखीचे प्रयोग केले, तत्त्वज्ञानाचा आणि धर्माचा सखोल अभ्यास केला, आत्मविश्वास गमावला आणि पुन्हा प्राप्त केला आणि प्रेमातील वेदना व आनंद अनुभवला. जगामध्ये स्वतःचं स्थान शोधताना त्यांनी त्या आव्हानांची उत्तरं शोधली, ज्यांना प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं. ते असं मानतात की, आपलं नशीब जाणण्यासाठी ज्या शक्तीची आपल्याला आवश्यकता असते, ती आपल्या आतमध्येच असते. आतापर्यंत त्यांच्या पुस्तकांचा 82 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि 170पेक्षा अधिक देशांमध्ये 32 कोटींपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. 1998मध्ये त्यांनी लिहिलेल्या द अल्केमिस्ट या कादंबरीच्या 8.5 कोटींपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. द अल्केमिस्टला मलाला युसूफझाई आणि फॅरेल विलियम्ससारख्या लोकांनी आपला प्रेरणास्रोत मानलं आहे. ते ब्राझिलियन अ‍ॅकेडमी ऑफ लेटर्सचे सदस्य आहेत आणि त्यांना ‘शेवलिअर् द लॉरद्रे नॅशनल द ला लिजन ऑनर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2007मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘मेसेंजर ऑफ पीस’ म्हणून त्यांना नियुक्त केले होते.

මෙම ඉ-පොත අගයන්න

ඔබ සිතන දෙය අපට කියන්න.

කියවීමේ තොරතුරු

ස්මාර්ට් දුරකථන සහ ටැබ්ලට්
Android සහ iPad/iPhone සඳහා Google Play පොත් යෙදුම ස්ථාපනය කරන්න. එය ඔබේ ගිණුම සමඟ ස්වයංක්‍රීයව සමමුහුර්ත කරන අතර ඔබට ඕනෑම තැනක සිට සබැඳිව හෝ නොබැඳිව කියවීමට ඉඩ සලසයි.
ලැප්ටොප් සහ පරිගණක
ඔබට ඔබේ පරිගණකයේ වෙබ් බ්‍රව්සරය භාවිතයෙන් Google Play මත මිලදී ගත් ශ්‍රව්‍යපොත්වලට සවන් දිය හැක.
eReaders සහ වෙනත් උපාංග
Kobo eReaders වැනි e-ink උපාංග පිළිබඳ කියවීමට, ඔබ විසින් ගොනුවක් බාගෙන ඔබේ උපාංගයට එය මාරු කිරීම සිදු කළ යුතු වේ. ආධාරකරු ඉ-කියවනයට ගොනු මාරු කිරීමට විස්තරාත්මක උදවු මධ්‍යස්ථාන උපදෙස් අනුගමනය කරන්න.