एक परोपकारी व्यक्ती, उद्योजिका असणार्या मेलिंडा गेट्स या स्त्रियांच्या आणि मुलींच्या वतीने जागतिक स्तरावर आवाज उठवत असतात. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या सह-अध्यक्षा या नात्याने जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक कार्याची दिशा आणि प्राधान्यक्रम त्या ठरवत असतात. त्याचबरोबर त्यांनी ‘पिव्होटल व्हेंचर्स’ या इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशन कंपनीची स्थापना केली आहे. अमेरिकेतील स्त्रियांची आणि कुटुंबांची सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी ही संस्था कार्य करते.