VASANTIKA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
112
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

सर्वोत्कृष्ट लघुनिबंधाचे संकलन श्री. वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेल्या पंधरा लघुनिबंधांचा हा प्रतिनिधिक संग्रह आहे. या संग्रहात सर्वश्री वामन मल्हार जोशी, आचार्य काका कालेलकर, साने गुरुजी, ना. सी. फडके, कुसुमावती देशपांडे, वि. पां. दांडेकर, अनंत काणेकर, डॉ. श्री. स. भावे, र. गो. सरदेसाई, वि. द. साळगावकर, बा. भ. बोरकर, वि. ल. बर्वे, ना. मा. संत, वि. वा. शिरवाडकर आणि खुद्द खांडेकर यांच्या लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या ललित गद्यलेखनाला आज आपण ‘लघुनिबंध' म्हणतो, तो खर्या अर्थाने १९३० च्या आसपास मराठी साहित्यात रूढ झाला. तेव्हापासून आतापय|त या साहित्यप्रकाराचा कसकसा विकास होत गेला, त्याचा आलेख आपणास ह्या संग्रहात सुस्पष्टपणे पाहावयास मिळतो. सर्वसामान्य लघुनिबंधात लेखकाच्या सामथ्र्याप्रमाणे काव्य, विनोद व तत्त्वज्ञान या तिन्हींचे मिश्रण होत असते. किंबहुना त्या संमिश्र मनोवृत्तीने दुधात साखर आणि केशर मिसळून जावीत, तसे या तिन्हींचे मिश्रण मनात होऊन तो लघुनिबंध - लेखनाला प्रवृत्त होतो. तथापि, या प्रातिनिधिक प्रकारातही एकमेकांजवळून वाहणारे दोन प्रवाह आहेत. पहिल्यात तंत्रनिष्ठेने येणारा डौल मोठ्या प्रमाणात दिसतो. दुसर्यात स्वभावनिष्ठतेमुळे निर्माण होणारा जिव्हाळा जसा अधिक आढळतो, तशीच कल्पना व विचार यांची स्वौरता अधिक, अंतर्मुखता किंवा चिंतनशीलता यामुळे येणार्या गांभीर्याच्या छटाही थोड्या अधिक गडद असतात. एवंगुणविशिष्ट अशा या लघुनिबंधसंग्रहाचे संपादन सुजाण आणि चोखंदळ वाचकांसाठीच करण्यात आले आहे. The collection was published for the exclusive readers. (This collection of is short essays was published by V.S. Khandekar) It is inclusive of shortessays by the well known authors like Acharya Kaka Kelkar, Sane Guruji, N. C. Phadke, Kusumavati Deshpande, V. P. Dandekar, Anant Kanekar, Dr. S. S. Bhave, R. G. Sirdesai, V. D. Salgaonkar, B. B. Borkar, V. L. Barve, N. M. Sant, V. V. Shirvadkar, and V. S. Khandekar. Short essay is a form of creative literature. It came into practice around 1930. This book represents a graph of the progress made by this type of literature. Generally speaking, a short essay is a mixture of poetry, humour and philosophy. Each short essay is the manifestation of an author`s imagination. When he produces them they appear in a blended form. It becomes difficult to differentiate each form of literature. All the essays reflect these qualities. Yet, this collection itself has two parallel styles. One tends to be more technical and one is more emotional. The emotional form reflects the unrestricted journey of imagination and thoughts. It also presents the darker shades of gravity.

關於作者

 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。