‘सत्य हे कल्पनेपेक्षाही केवळ अद्भूतच नाही तर विदारकही असते.' याचा पदोपदी प्रत्यय लेखक व. कृ. जोशी यांना त्यांच्या पोलिसीसेवेत आला असल्याने त्यांच्या रहस्य कथा साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. या कथांचे दुसरे वेगळेपण म्हणजे यांतील इन्स्पेक्टर प्रधान या पोलिस अधिकाऱ्याची प्रतिमा. मराठी साहित्यात तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे चित्रण हे काहीसे विकृत स्वरुपात दाखवले गेले आहे. वास्तविकदृष्ट्या पाहिले तर गुन्ह्यांचा तपास हे एक शास्त्र आहे आणि कलाही आहे. तेव्हा बुद्धिमत्ता, चातुर्य आणि धाडस इत्यादी गुण असल्याशिवाय यशस्वी तपास होऊच शकत नाही. हे सत्य या कथांमधील पोलिस प्रतिमेमुळे वाचकांच्या निदर्शनास येईल.’