व. कृ. जोशी यांच्या पोलिसकथांमधून सतत वाचनात आलेली `इन्स्पेक्टर प्रधान' ही वाचकांची लाडकी व्यक्तिरेखा पुन्हा आपल्या भेटीला येत आहे! सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा काळ वाटावा अश्या या पोलिस अधिकाऱ्याच्या गाजलेल्या शोधकथा या पुस्तकात संगृहीत केल्या आहेत.पानोपानी उत्सुकता वाढवणारे प्रसंग, कथेच्या शेवटी भीषण वास्तवाचे दर्शन घडवतात.गुन्हेगारी विश्वातील रोमहर्षकतेचा पदोपदी प्रत्यय देणाऱ्या या कथा वाचकांना निश्चितच आवडतील.