प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं - अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एका क्षणाशी असतं. दुसऱ्याच क्षणी तो अनुभव जुना झालेला असतो. तो क्षण आनंदाचा असो की दु:खाचा. प्रत्येक क्षणाचा, अनुभवाचा रंगही अलग आणि अनुभूतीही अलग. वेदनेच्या स्पर्शानं व्यक्तीनुरूप मनाच्या सप्तरंगाचं दर्शन घडतं. कधी वेदनेतून अत्युच्च मन:सामथ्र्याचं इंद्रधनुष्य झळाळतं, तर कधी निराशेच्या काळ्या रंगाचं साम्राज्य पसरतं. ज्या क्षणी हा वेदनेचा स्पर्श होतो, त्या क्षणातच बिजलीप्रमाणे मनाचे हे रंग झळाळून उठतात. या मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं. यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणाNया मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा अंतर्मुख करणाऱ्या .....स्वत:लाच शोधायला लावणाऱ्या ....
Every new experience, which makes us shiver, is always related to a moment; it remains with us throughout, but loses its newness the very next moment. That moment may be happy or sad, but each one will cherish its own peculiarity. Some of the moments are very tender yet have the strength to reveal the rainbow colours of life; sometimes gloomy, sometimes shiny, sometimes with a silver lining and sometimes with a black shadow. But the moment this tenderness touches us, it brightens our mind. Through this book, Va Pu introduces us to these rainbow colours of life, he colours the canvas in various shades of feelings. Each of his pictures has such potential that it engulfs us within it, urging us to find ourselves, through the pains and agonies of those revealed.