प्रिय व. पु, ... तुमची एकूण कथा वाचताना असं वाटतं, की तुम्ही गोष्ट सांगत आहात आणि आम्ही ती `ऐकतो' आहोत. मराठी कथा-वाङ्मयाच्या प्रवासात कथेनं जी वेगवेगळी वळणं घेतली आहेत, ती सर्व तुमच्या कथांतून दिसतात. मराठी कथेच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची कथा थांबून, थोडं मागं पाहून, पुढं सरकली आहे. व. पु., तुमची कथा नव्यांत नवी आणि जुन्यांत जुनी आहे. तिनं परंपरेला सोडलं नाही, की नवतेला अव्हेरलं नाही. तुमची कथा धबधब्याप्रमाणे वाहत नाही, समुद्राप्रमाणे अथांग वाटत नाही, नदीप्रमाणे किणाऱ्यालगत सुपीकता देत नाही. ती झऱ्याप्रमाणे झुळझुळ वाहते, गुणगुणते. रसिकांवर मोहिनी घालते... मधु जामकर