वि. स. खांडेकरांनी "समाधीवरली फुले' या त्यांच्या नव्या कथासंग्रहात एकूण नऊ कथा अंतर्भूत केल्या आहेत. या सार्याच कथांतून त्यांनी मानवी मनाचं अत्यंत प्रत्ययकारी विश्लेषण केलं आहे. काळ बदलतो, तशी भोवतालची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीही बदलते; आणि म्हणून जुन्या पिढीनं गतानुगतिक न राहता वर्तमानातील जे जे उत्तम असेल, त्याचं स्वागत करायला हवं. विसाव्या शतकाच्या तिसर्या-चौथ्या दशकांतील हे स्थित्यंतर खांडेकरांनी या कथांमधून अत्यंत समर्थपणे शब्दांकित केलं आहे.