‘‘...या लहरीपणामुळेच वारा अधिक आवडतो मला. तेजाचे सारे काम अगदी यंत्रासारखे, जलदेवी थोडीफार लहरी आहे खरी! पण अफाट समुद्रातील तिच्या लहरींतसुद्धा सीमा असतेच की! वायुलहरीचे तसे नाही. त्या आता कानगोष्टी करतील, तर आता कानशिलात लगावतील. वायुकुमार घटकेत जलदेवीच्या खेळण्यातील गुलाबदाणी आणून तिच्यातील सुवासिक शीतल तुषार अंगावर उडवील, तर दुसऱ्या घटकेला तेजाच्या हातातील ऊन पाण्याची झारी अंगावर ओतून चांगले चटकेही देईल. तुम्ही दार घट्ट लावून लेखनाला बसा अगर चार दिवसात एकान्तात गाठ न पडलेल्या पत्नीच्या गालावरील गुलाब का सुकले आहेत याचे पाच मिनिटात संशोधन करायला सुरुवात करा, तुमच्या बंदिस्त दरवाजाचे दार वाजू लागते. त्रासून तर दार उघडायला जावे तो काय! दार ठोठावून वाऱ्याची स्वारी केव्हाच निघून गेलेली असते...’’ कधी तरल, काव्यात्म होणारे, तर कधी टीका करणारे, कधी जीवनाविषयीचे चिंतन अभिव्यक्त करणारे –खांडेकरांचे अभिजात लघुनिबंध.According to Hinduism Pancha Bhoota or Pancha Maha-Bhoota Prithvi (earth), Jal (Water), Agni (Fire), Vayu (Air) & Aakash (Aether) are the basis of all cosmic creation. These elements have different characteristics and these also account for different faculties of human experience. Loopy wind or air has its unique characteristics which could be seen in human nature too. V.S.Khandekar portraits such characters in epigrammatic style in his short-essays in Vayulahari. These Modern essays are poetic, philosophical & meditative.