Vichar Niyam Aani Kshamechi Jadoo (Marathi)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
3.9
සමාලෝචන 8ක්
ඉ-පොත
64
පිටු
ඇගයීම් සහ සමාලෝචන සත්‍යාපනය කර නැත වැඩිදුර දැන ගන්න

මෙම ඉ-පොත ගැන

विचार नियम आणि क्षमा
दोन जादुई पायर्‍या

‘विचार नियम’… सरश्रींच्या अमूल्य लेखणीतून साकारलेलं अद्वितीय पुस्तक! लाखो लोकांच्या जीवनात वैचारिक क्रांती घडवून आणणारा ग्रंथ. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली सात विचारसूत्रे म्हणजे यशोशिखरावर नेणार्‍या जादुई पायर्‍या. आज ‘विचार नियम’ पुस्तक वाचणारा प्रत्येक वाचक प्रेम, आनंद, शांती, समृद्धी आणि संतुष्टीचं वरदान प्राप्त करतोय. विचार नियम या विषयाइतकाच दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सर्व प्रकारच्या कर्मबंधनांतून मुक्त करणारी ‘क्षमासाधना’. या दोन्ही विषयांचे विविध पैलू सरश्रींनी अनेक प्रवचनांतून सविस्तरपणे मांडले आहेत. प्रस्तुत पुस्तिका म्हणजे या दोन विषयांचं सारांशरूपातील सादरीकरण!

यशस्वी सांसारिक आयुष्य असो वा मोक्षप्राप्तीचं लक्ष्य, विचारांचं शास्त्र जाणल्याशिवाय मनुष्य कोणतीच गोष्ट प्राप्त करू शकत नाही. शिवाय, क्षमासाधना केल्याशिवाय तो नकारात्मक विचार आणि दुःखदायक भावनांतून मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच ज्याला सर्वोच्च आनंद हवाय, त्यानं ही पुस्तिका कायम जवळ बाळगायला हवी… विचार नियम आणि क्षमेची जादू जीवनाच्या प्रत्येक स्तरावर अनुभवायला हवी.

ඇගයීම් සහ සමාලෝචන

3.9
සමාලෝචන 8ක්

කර්තෘ පිළිබඳ

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

මෙම ඉ-පොත අගයන්න

ඔබ සිතන දෙය අපට කියන්න.

කියවීමේ තොරතුරු

ස්මාර්ට් දුරකථන සහ ටැබ්ලට්
Android සහ iPad/iPhone සඳහා Google Play පොත් යෙදුම ස්ථාපනය කරන්න. එය ඔබේ ගිණුම සමඟ ස්වයංක්‍රීයව සමමුහුර්ත කරන අතර ඔබට ඕනෑම තැනක සිට සබැඳිව හෝ නොබැඳිව කියවීමට ඉඩ සලසයි.
ලැප්ටොප් සහ පරිගණක
ඔබට ඔබේ පරිගණකයේ වෙබ් බ්‍රව්සරය භාවිතයෙන් Google Play මත මිලදී ගත් ශ්‍රව්‍යපොත්වලට සවන් දිය හැක.
eReaders සහ වෙනත් උපාංග
Kobo eReaders වැනි e-ink උපාංග පිළිබඳ කියවීමට, ඔබ විසින් ගොනුවක් බාගෙන ඔබේ උපාංගයට එය මාරු කිරීම සිදු කළ යුතු වේ. ආධාරකරු ඉ-කියවනයට ගොනු මාරු කිරීමට විස්තරාත්මක උදවු මධ්‍යස්ථාන උපදෙස් අනුගමනය කරන්න.