५२०० वर्षांच्या दीर्घ कालानंतर श्रीमद्भगवद् गीतेची शाश्वत व्याख्या
श्रीकृष्णाने ज्या वेळी गीतेचा उपदेश दिला होता, त्यावेळी त्यांच्या अंतरंगात कोणते भाव होते? मनातील समस्त भाव सांगितले जात नाहीत. फार थोडे सांगितले जातात. थोडे भावावेशात व्यक्त होतात आणि शेष क्रियात्मक असतात. म्हणजे एखादा साधक साधनमार्गावर चालूनच ते जाणू शकतो. ज्या एका स्तरावर श्रीकृष्ण होते, ती अवस्था प्राप्त करुन घेतलेले महापुरुषच गीता काय सांगते ते जाणतात. ते गीतेतल्या ओळींचा केवळ पुनरोच्चार करीत नाहीत तर त्यावेळी श्रीकृष्णांच्या मनातील भाव पण स्पष्टपणे दाखवू शकतात. कारण त्या वेळी श्रीकृष्णाच्या समोर जे दृश्य होते तेच दृश्य त्या वर्तमान महापुरुषांसमोर पण आहे. म्हणून असा महापुरुष ते पाहू शकतो, इतरांना दाखवू शकतो, तुमच्यात ते जागृत पण करु शकतो, त्या मार्गावर तुम्हाला यशस्वीपणे चालवूही शकतो.
`पूज्य श्री परमहंसजी महाराज' देखील त्या पातळीवरील महापुरुष होते. त्यांच्या वाणीद्वारे व अंतःप्रेरणेद्वारे गीतेचा जो अर्थ प्राप्त झाला त्याचे संकलन म्हणजे `यथार्थ गीता’ आहे.
- स्वामी अड़गड़ानन्द
लेखकाविषयी.....
`यथार्थ गीता' या पुस्तकाचे लेखक एक अशा प्रकारचे संत आहेत की त्यांच्या जवळ एकही शैक्षणिक पदवी नाही. पण सद्गुरुंची अपार कृपा त्यांना लाभलेली आहे. त्यामुळे त्यांची जीवनयात्रा ईश्वरीय आदेशानुसार चालू आहे. सुरुवातीस लेखकश्रींना लेखन म्हणजे भजन साधनातील अडथळा वाटे. परंतु या गीतेवरील भाष्याबाबत भगवंताची आज्ञा हीच निमित्तरुप झाली आहे. भगवंतानी त्यांना ध्याना मध्ये सांगितले की, आपल्या सर्व वृत्ती शांत झाल्या आहेत. फक्त एक गोष्ट बाकी राहिली आहे व ती म्हणजे गीतेवर भाष्य लिहिणे. सुरुवातीस भजनातच व्यस्त राहून ही गोष्ट टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु भगवंताचा आदेश बदलला नाही. त्या आदेशाचे मूर्त-स्वरुप म्हणजेच `यथार्थ गीता' हे भाष्य होय. हे भाष्य करताना जिथे जिथे त्रुटी राही तेथे भगवंत ती सुधारित असत. स्वामीजींनी स्वान्तः सुखाय लिहिलेली ही कृती सर्वान्तः सुखाय बनावी, हीच शुभकामना!
विसाव्या शतकाच्या अंतिम महाकुंभ मेळ्याच्या पर्वामध्ये हरिद्वार येथील सर्व शंकाराचार्य, सर्व महामंडालेश्वर, ब्राह्मण महासभा आणि ४४ देशातील धर्मशील विव्दानांच्या उपस्थितीमध्ये विश्वधर्म संसदेद्वारा पूज्य स्वामीजींना ‘‘विश्वगौरव’’ हे सन्मानपत्र अर्पण करण्यात आले.
विंश्वमानव धर्मशास्त्र श्रीमद्भगवतगीता या महान ग्रन्थावरील ‘यथार्थ गीता’ ह्या भाष्याबद्दल परमपूज्यस्वामी श्री अडगडानन्द महाराजांना दि. २६ जानेवारी २००१ रोजी महाकुंभ पर्व, प्रयाग येथे ‘‘विश्वगुरू’’ ह्या सन्माननीय पदवीने सन्मानित करण्यात आले व जनसेवा क्षेत्रात ‘श्रेष्ठ अग्रणी’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
भारताच्या सर्वोच्च श्री काशी विद्वत् परिषदेने दिनांक ०१-०३-२००४ रोजी ‘‘श्रीमद्भगवद्गीते’’ ला धर्मशास्त्र आणि ‘‘यथार्थ गीते’’ ला परिभाषा म्हणून स्वीकृत केले आहे.
अधिक माहिती साठी, आमच्या वेबसाइटवर भेट: http://yatharthgeeta.com/