स्विच अ‍ॅक्सेस

३.५
५२.६ ह परीक्षण
५० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तुमचा फोन किंवा टॅबलेट हे स्विच अथवा फ्रंट कॅमेरा वापरून नियंत्रित करा. तुम्ही आयटम निवडण्‍यासाठी, स्क्रोल करण्यासाठी, मजकूर एंटर करण्यासाठी आणि आणखी बऱ्याच गोष्टी करण्यासाठी स्विच वापरू शकता.

स्विच अ‍ॅक्सेस हे टचस्क्रीनऐवजी एक किंवा अधिक स्विच वापरून तुम्हाला तुमच्या Android डिव्हाइससह संवाद साधण्यात मदत करते. तुम्ही तुमच्या डिव्हाइसशी थेट संवाद साधू शकत नसल्यास, स्विच अ‍ॅक्सेस उपयोगी ठरू शकते.

सुरुवात करण्यासाठी:
१. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
२. अ‍ॅक्‍सेसिबिलिटी > स्विच अ‍ॅक्सेस वर टॅप करा.

स्विच सेट करा

स्विच अ‍ॅक्सेस तुमच्या स्क्रीनवरील आयटम स्कॅन करते आणि तुम्ही निवड करेपर्यंत प्रत्येक आयटम हायलाइट करते. तुम्ही काही प्रकारच्या स्विचमधून निवडू शकता:

प्रत्यक्ष स्विच
• USB किंवा ब्लूटूथ स्विच, जसे बटण अथवा कीबोर्ड
• डिव्‍हाइसवरील स्विच, जसे व्‍हॉल्‍यूम बटण

कॅमेरा स्विच
• तुमचे तोंड उघडा, हसा किंवा तुमच्या भुवया वरती करा
• डावीकडे, उजवीकडे अथवा वरती पहा

तुमचे डिव्हाइस स्कॅन करा

स्विच सेट केल्यानंतर, तुम्ही स्कॅन करू शकता आणि स्क्रीनवरील गोष्टींसह संवाद साधू शकता.

• लिनीअर स्कॅनिंग: आयटमदरम्यान एका वेळी एक असे हलवा.
• रो-कॉलम स्कॅनिंग: एकावेळी एक पंक्ती स्कॅन करा. पंक्ती निवडल्यानंतर, त्या सूचीमधील आयटमदरम्यान हलवा.
• पॉइंट स्कॅनिंग: विशिष्ट आडवे आणि उभे स्थान निवडण्यासाठी हलणार्‍या रेषा वापरा, त्यानंतर "निवडा" प्रेस करा.
• गट निवड: वेगवेगळ्या रंग गटांना रंग असाइन करा. स्क्रीनवरील सर्व आयटमना एक रंग असाइन केला जाईल. आयटमच्या आसपास तुम्हाला हव्या असणाऱ्या रंगाशी सुसंगत असा स्विच प्रेस करा. तुम्ही तुमच्या निवडीवर पोहोचेपर्यंत गटाचा आकार लहान करा.

मेनू वापरा

एखादा घटक निवडला जातो, तेव्हा तुम्हाला निवडणे, स्क्रोल करणे, कॉपी करणे, पेस्ट करणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींसह मेनू दिसेल.
तुम्हाला तुमचे डिव्हाइस वापरण्यात मदत करण्यासाठी स्क्रीनच्या सर्वात वरती एक मेनूदेखील असेल. उदाहरणार्थ, तुम्ही सूचना सुरू करू शकता, होम स्क्रीनवर जाऊ शकता, व्हॉल्यूम बदलू शकता आणि आणखी बऱ्याच गोष्टी करू शकता.

कॅमेरा स्विच वापरून नेव्हिगेट करा

तुमचा फोन फेशियल जेश्चर वापरून नेव्हिगेट करण्यासाठी तुम्ही कॅमेरा स्विच वापरू शकता. तुमच्या फोनचा फ्रंट कॅमेरा वापरून तुमच्या फोनवरील अ‍ॅप्स ब्राउझ करा किंवा निवडा.
तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रत्येक जेश्चरची संवेदनशीलता आणि कालावधीदेखील कस्टमाइझ करू शकता.

रेकॉर्ड शॉर्टकट

स्विचला असाइन केली जाऊ शकतात किंवा मेनूमधून सुरू केली जाऊ शकतात अशी स्पर्श जेश्चर तुम्ही रेकॉर्ड करू शकता. स्पर्श जेश्चरमध्ये पिंच करणे, झूम करणे, स्क्रोल करणे, स्‍वाइप करणे, दोनदा टॅप करणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असू शकतो. तुम्ही त्यानंतर स्वतंत्र स्विच वापरून वारंवारता किंवा जटिल कृती सुरू करू शकता, उदाहरणार्थ ई-पुस्तकाची दोन पेज उलटण्यासाठी दोनदा डावीकडे स्वाइप करणारे जेश्चर रेकॉर्ड करणे.

परवानग्यांशी संबंधित सूचना
• अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा: हे ॲप अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्यामुळे, ते तुमच्या कृतींचे निरीक्षण करू शकते, विंडो आशय पुन्हा मिळवू शकते आणि तुम्ही टाइप केलेल्या मजकुराचे निरीक्षण करू शकते.
या रोजी अपडेट केले
२१ ऑग, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, मेसेज आणि इतर 4
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.५
५१.९ ह परीक्षणे
सुभाष तुकाराम तुपेकर
२५ सप्टेंबर, २०२४
धन्यवाद तुपेकर
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
jay manthalkar
२८ ऑगस्ट, २०२४
मस्त 👌🏻
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Tanaji Thombare
१७ सप्टेंबर, २०२४
An Heavf Chadhwaj seo
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

या अपडेटमध्ये बग फिक्सचा समावेश आहे.