PhotoScan हे Google Photos मधील स्कॅनर ॲप आहे जे तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून तुमचे आवडते प्रिंट केलेले फोटो स्कॅन आणि सेव्ह करू देते.
उत्कृष्ट दर्जाचे आणि ग्लेअर नसलेले फोटो घ्या
फक्त फोटोचा फोटो घेऊ नका. तुमचे फोटो कुठेही असले, तरीही त्यांचे वर्धित डिजिटल स्कॅन तयार करा.
– सोप्या स्टेप बाय स्टेप कॅप्चर फ्लोच्या मदतीने ग्लेअर नसलेले स्कॅन मिळवा
– कडांच्या डिटेक्शनवर आधारित ऑटोमॅटिक क्रॉपिंग
– पर्स्पेक्टिव्ह करेक्शनच्या मदतीने सरळ, आयताकृती स्कॅन मिळवा
– स्मार्ट रोटेशनची सुविधा दिली आहे, जेणेकरून तुम्ही फोटो कसेही स्कॅन केलेत, तरीही त्यांची योग्य बाजू वरती राहील
काही सेकंदांमध्ये झटपट स्कॅन करा
तुमचे आवडते प्रिंट केलेले फोटो झटपट आणि सहजपणे स्कॅन करा, जेणेकरून तुम्हाला ते संपादित करण्यात कमी वेळ घालवावा लागेल व लहानपणी वाइटप्रकारे कापलेल्या तुमच्या केसांकडे आनंदाने पाहण्यात तुम्ही जास्त वेळ घालवू शकाल.
Google Photos च्या मदतीने ते सुरक्षित आणि शोधसुलभ ठेवा
तुम्ही स्कॅन केलेले फोटो सुरक्षित, शोधसुलभ आणि संगतवार ठेवण्यासाठी Google Photos वापरून तुमच्या स्कॅनचा बॅकअप घ्या. चित्रपट, फिल्टर व प्रगत संपादन नियंत्रणे वापरून तुमचे स्कॅन चैतन्यपूर्ण बनवा, तसेच फक्त एक लिंक पाठवून ते कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करा.
या रोजी अपडेट केले
२४ जुलै, २०२३