इंग्रजीत तुफान गाजलेली अमीश त्रिपाठीची शिव ट्रायलॉजी आता मराठीमध्ये... शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरं भरतं, त्या आपल्या खऱ्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो. काय होतं या युद्धात? त्याला ज्यांनी कधीच मदत केलेली नसते, त्याच वायुपुत्रांकडे जाण्याची वेळ त्याच्यावर येते. या लढाईत तो यशस्वी होतो का? त्यासाठी त्याला काय किंमत मोजावी लागतेॽ अशा गूढ प्रश्नांची उत्तरं अमीश त्रिपाठीच्या बेस्टसेलर शिव-त्रिसूत्रीमधल्या 'शपथ वायुपुत्रांची' या पुस्तकामध्ये सापडतात. ऐका उदय सबनीस यांच्या आवाजात 'शपथ वायुपुत्रांची'.