परिस्थितीमुळे किंवा आवडीने काहीजण, काही उद्योगधंदा न करता, गावोगाव फिरत राहतात. नशिबानं मिळेल ते खाणं आणि रात्री मिळालाच तर निवारा, हेच त्यांचं जीवन. असेच दोन जण कडाक्याच्या थंडीत प्रवास करताना वाटेत भेटतात.काही तास एकत्र चालत राहतात. त्यातला एक अगदीच तरुण आणि अत्यंत आजारी आहे, तरीही त्याची जिद्द अफाट आहे. योगायोगानं, गाडीनं जाणारा एक डॉक्टर त्याला भेटतो आणि उपचारांसाठी त्याला घेऊन जातो. पुढे काय होतं?