ही खूप प्राचीन गोष्ट आहे. एक राक्षस असतो. त्याच्या मालकीची एक सुंदर बाग असते. तिथे अनेक प्रकारच्या फळा- फुलांची आणि झाडं आणि पक्षी असतात. एकदा तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी दूरदेशी जातो. ती संधी साधून जवळच्या शाळेतील मुलं मोकळ्या वेळात तिथे आनंदात खेळू लागतात. सात वर्षांनी राक्षस परत येतो आणि त्याच्या बागेतील मुलांना हाकलून लावतो. त्यानंतर त्याच्या बागेतली झाडं नष्ट होतात. पक्षी फिरकेनासे होतात. राक्षस दुःखी होतो. एके सकाळी तो गच्चीत उभा असताना पक्षी परत येऊ लागतात. झाडं बहरू लागतात. काय आहे यामागचं रहस्य ?
Beletrystyka i literatura