कलेला जीवन वाहिलेल्या व्यक्तीने लग्नाच्या भानगडीत पडावं की नाही ? त्याचं पहिलं लग्न आवडीच्या कलेबरोबर लागलेलं असतं. डोक्यात सदैव आगामी कलाकृतीविषयीचा विचार किंवा तिची प्रत्यक्ष निर्मिती सुरू असते. कितीही संवेदनशील असलं तरीही आपल्या सहचरणीच्या भावना त्याच्या लक्षात येऊ शकत नाहीत. त्याचं पर्यावसन दुःखद , वेदनामय होऊ शकतं. दैवाचा खेळ !