एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या रेसच्या पैजेखातर स्वतःची 'स्पीड ब्रेक' दुसऱ्याच्या हातात देऊन त्यांची इंपाला कार हातात घेणाऱ्या फिरोझ इराणीला खोट्या रेसमध्ये अडकवले जाते. राजमणी केमिकल्सचे संचालक नवरतन राजमणी यांचा खून होतो आणि त्यांचे प्रेत फिरोझच्या स्पीड ब्रेकमध्ये सापडते. असामी मोठी असल्याने चक्रे वेगाने फिरतात. यात राजमणी यांचे मृत्युपत्र काही वेगळे सांगणारे तर त्यांच्या मालमत्तेत वाटा मागणारे लोक वेगळे. मात्र त्यांच्या मर्डरचा आरोप असलेला फिरोझ यालाच जणू सगळी संकटे जणू शोधत येत असतात. पुढे नक्की काय होते? फिरोझ यातून स्वतःला सोडवू शकेल का? काय आहे नक्की सत्य? कोण आहे यामागे? रहस्य सॉलिड आहे! सिद्धहस्त लेखक सुहास शिरवळकर यांच्या सुप्रसिद्ध सॉलिड या थरार कादंबरीला आता ऐका स्टोरीटेल वर मिलिंद इंगळे यांच्या आवाजात!