कैकेय नावाच्या राज्यात विक्रमसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याचे लवकर निधन झाले आणि त्याच्या जागी त्याचा चंद्रसेन नावाचा लहरी , राज्य करण्यास नालायक असा मुलगा राज्य करू लागला. याच राज्यात कृष्णदास नावाचा अतिशय श्रीमंत व्यापारी होता. प्रचंड संपत्ती असूनही निगर्वी, शांत विनम्र असा त्याचा नावलौकीक होता. पन्नासाव्या वर्षी निवृत्त होऊन त्याने जनतेच्या, गोरगरीबांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले. तरूण राजाला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. त्याने कृष्णदासाचा छळ सुरू केला. पण त्याने विचलित न होता कृष्णदासाने चंद्रसेनेचे ह्रदयपरिवर्तन कसे केले याची ही कथा... !