AS THE CHILDREN EXPLORE THE MOUNTAINS, THEY MAKE NEW FRIENDS, LEARN ABOUT PAHADI FOLK TRADITIONS, MARVEL AT BREATHTAKING SUNSETS AND TRAVEL TO VARIOUS DESTINATIONS.
FROM THE BESTSELLING AUTHOR OF GRANDMA’S BAG OF STORIES AND GRANDPARENTS’ BAG OF STORIES, SUDHA MURTY, COMES ANOTHER COLLECTION OF IMMERSIVE, CAPTIVATING AND SENSORIAL TALES WITH AN EXCITING NEW TWIST!"
"भारतातल्या आघाडीच्या बालसाहित्यकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथामालिकेतील एक नवीन रोमांचकारी साहसकथा!
अनुष्का, कृष्णा, मीनू आणि रघू आपल्या आजी आजोबांसोबत उत्तराखंडमधील डोंगराळ भागात वसलेल्या मायावतीच्या दिशेने साहससफरीला निघाले आहेत - चला, आपणही त्यांच्या सोबत तिकडे जाऊया. पण आपली ही सहल अनपेक्षित अशा मंतरलेल्या गोष्टींनी भरलेली असेल, हे त्या मुलांना तरी कुठे माहीत आहे? या खेपेस आपल्या नातवंडांना वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टी सांगण्याचं काम त्यांच्या प्रेमळ आजोबांनी स्वत:कडे घेतलं आहे. हिमाच्छादित पर्वतशिखरं आणि उंच उंच देवदार वृक्षांनी वेढलेल्या या प्रदेशात फिरताना या मुलांचे आजोबा राजेरजवाड्यांच्या, राजपुत्रांच्या, जलपऱ्यांच्या, इतकंच नव्हे तर कार्ल्याच्या भाजीच्यासुद्धा कथा मोठ्या कौशल्याने गुंफतात आणि त्या कथांच्या माध्यमातून कितीतरी ज्ञान सहजगत्या त्या मुलांना देतात.
मुलं जेव्हा त्या डोंगराळ भागात फेरफटका मारायला निघतात तेव्हा तिथे त्यांना नवे मित्र भेटतात. त्यांना पहाडी लोकवाड्मयाबद्दल, पहाडी संस्कृतीबद्दल खूप काही शिकायला मिळतं, डोंगरमाथ्यावरून अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं मनोरम दृश्य पाहायला मिळतं आणि नवनवीन ठिकाणांना भेटी देता येतात.
“आजीच्या पोतडीतल्या गोष्टी” आणि “आजी- आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी” या सुधा मूर्ती लिखित दोन लोकप्रिय पुस्तकांच्या यशानंतर आता त्याच मालिकेतील हा आणखी एक बालवाचकांना मंत्रमुग्ध करणारा आणि त्यांना एका अनपेक्षित वळणावर नेऊन ठेवणारा कथासंग्रह आला आहे."