आनंद यादवांची विनोदी कथा शाब्दिक कोटिक्रम किंवा भाषिक विनोदावर आधारलेली नाही. ती ग्रामीण जीवनावरील व्यक्ती, प्रसंग, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती यांच्यावर आधारलेली आहे. या बाबींतील विसंगती, उथळ जगण्याच्या प्रवूत्तीतून निर्माण झालेली हास्यस्पद्ता ते अचूकपणे टिपतात आणि त्यातून त्यांची कथा ऐटबाज भाषेत आकाराला येते. यादवांची विनोदी कथा नुसतीच मनोरंजनवादी नाही. ती परिस्थितीवर, समाज जीवनावर आणि मानवी स्वभावावर विनोदी शैलीत भाष्य करते. या त्यांच्या वैशिष्यांमुळे तांच्या विनोदी कथेला पुष्कळ वेळा कारुण्याची झालर लाभते. त्यामुळे यादवांची विनोदी कथा वाचकाला शेवटी अंतर्मुख करते. हे या कथेच खास वेगळेपण मानवं लागतं.