कलावंताच्या जीवनातील भयानक दारिद्र्य आणि मनातील कलात्मक उर्जा यातील जीवघेण्या संघर्षाची शोकात्म कादंबरी मराठीतील एक अव्वल दर्जाची, कलात्म आणि शोकात्म कादंबरी. ‘नटरंग’मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झालेली आहेत. प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनवण्याची, त्यांना मनोवैज्ञानिक स्पर्श देण्याची, प्रसंगातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची लेखकाची क्षमता विलक्षण आहे. त्यामुळे कादंबरीचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले आहे. ‘नटरंग’ ही एका भारतीय कलावंताची शोकांतिका. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य आणि कलात्मक ऊर्जा, कलावंताचे कुटुंब आणि कलावंताचे कला-व्यक्तिमत्त्व, मातंग समाजाची रूढिग्रस्त जनमान्य जीवनशैली आणि तिच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने आणि कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणारा कलावंत, कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी करू पाहणारे सहकारी आणि कलेच्या विशुद्धतेचा ध्यास घेऊ पाहणारा कलावंत, अशी संघर्षाची विविध आणि व्यामिश्र रूपे ‘नटरंग’मध्ये एकजीव झालेली आहेत. Set in the 1970s, Natarang is a very renowned novel in Marathi literature, one of its own type. It is illustrious as well as gloomy. This pictures almost all Yadav's skill as a writer. He possesses an immense quality to picture the events truly, making them very interesting, giving them a touch of psychoscientific aspect. He has a perfect sense of humour and compassion, catches it without fail and makes the novel lively. 'Natrang' is a mournful novel of an Indian artist. It has many aspects of experience. It is a homogenous mixture of the intense poverty and artistic energy, an artist's family and the artist's personality. The author has portrayed the lifestyle of an artist from the 'matang' community. He wants to leave the safe boundaries, lead his life in a different manner, away from the traditions, wants to produce some fine arts, he is inspired by his soul. He has to fight with the artists who are ready to sell their art for the sake of money. The author portrays perfectly well the artist with his purest mind dedicated towards arts. Dr. Chandrakant Bandiwadekar.