नमस्कार,
अर्थ मराठी ई-दिवाळी अंक यंदा चैथ्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांना सतत काही ना काही नवीन देता यावं यासाठी प्रत्येक वर्षी जे काही शक्य आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आपल्या ई-दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेतर्फे सलग दोन वर्षे (2014 आणि 2015) सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं श्रेय माझ्या सादरीकरणापेक्षा नेहमी माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नीला, माझ्यामध्ये साहित्याची बीज पेरणार्या माझ्या वडीलांना, माणूस म्हणून जग दाखवणार्या माझ्या आज्जीला जातं. आणि अर्थातच दिवाळी अंकामध्ये लेख आणि काव्य सादर केलेल्या सर्व नवोदित आणि दिग्गज साहित्यीकांना जातं. दिवाळी अंकावर आपलं प्रेम असंच असु द्या.
आपलाच,
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
(संपादक)
आपणा सर्वांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा!