विदुर महाभारत काळातील एक सर्वमान्य, महाबुद्धिवान, नीतिमान, संमजस, मान्यवर व्यक्तिमत्त्व. महाभारतामध्ये उद्योगपर्वात अध्याय 33 ते 40 मध्ये त्याने धृतराष्ट्राला केलेला उपदेश विदुरनीती म्हणून प्रसिद्ध आहे. ही नीती सार्वकालिक आहे. म्हणजेच ती आजही तितकीच उपयुक्त आहे. म्हणून आज सुख शांतीने जगू इच्छिणाऱ्या सर्व सामान्य माणसांना तिचा लाभ व्हावा म्हणून मुद्दाम फक्त मराठीतून ही प्राचीन विदूरनीती प्रसिद्ध करीत आहोत.