- अयोध्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने
- मंदिर रचना, आणि पर्यटनः एक विचार
- उर्जा प्रदान करणारी महाशिवरात्र
- विविध सेवा कार्य/उपक्रम राबविणारे अमरावतीचे श्री अंबादेवी देवस्थान
- रामलल्ला दर्शन एक अमृतानुभव
- आधुनिक काळातील मंदिरांची जबाबदारी आणि कर्तव्ये
- सुभांशा बंगला केस
- आवरण
- क्रांतदर्शी महामा बसेश्वर
- मंदिर उत्पन्नावर कर- कर्नाटक सरकारचा निर्णय पारित नाही झाला कर्नाटकातील मंदिरांची व्यवस्था
- हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉवमेंट कायदा
- महाराष्ट्रातील वैदिकांतर्फे अयोध्येत श्रीराम यज्ञाची सांगता
- उत्तरप्रदेशमधील बागपत जवळची पांडवकालीन लाक्षागृह भूमी हिंदूंना पुन्हा मिळणे हा विजयदिन
- फाल्गुन मास परिचय
- मार्च महिन्यातील यात्रा महोत्सव
मंदिरकेंद्रित महामंदिर हे मासिक मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयामाच्या वतीने सुरू केले आहे. मंदिर विश्वस्त आणि कार्यकर्ते यांना सर्व दृष्टीने माहितीच्या दृष्टीने अद्ययावत व परिपूर्ण करणे ही भूमिका घेऊन हे मासिक आहे .मंदिरांची रचना अधिक प्रभावी, चांगली समर्थ व्हावी या दृष्टीने कार्यरत सर्व विश्वस्त, पुरोहित, तज्ञ, कार्यकर्ते, लेखक, अभ्यासक, चिंतक आणि मंदिराविषयी आस्था असणारे सर्व भाविक यांच्याकरिता हे मासिक आहे. मंदिरा समोरचे प्रश्न, त्यांच्याशी संबंधित कायदे, निवाडे, परिपत्रके, मंदिर संबंधित बातम्या, मंदिरांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, मंदिरांची सेवाकार्ये, तज्ञांचे मार्गदर्शन, मंदिरांची स्थापत्य कला, असे विविध विषय या मासिकात राहतील. मंदिरांचे वेगळे उपक्रम, यात्रा, मंदिर व्यवस्थापन, यात्रा व्यवस्थापन अशा सगळ्यांसाठी यात स्थान आहे.
मंदिर संबंधित पुस्तकांचा परिचय, मंदिर अभ्यासकांच्या कार्याचा परिचय, मंदिर संबंधित विविध संस्था, संघटना, समूह यांच्या कामाचा परिचय, या अंकात राहील. मंदिर व्यवस्थापन संबंधित विविध तंत्रज्ञानाची या कामाची पण माहिती यात दिली जाईल. यात चित्रकार, ग्राफिक डिझायनर ही मंडळी पण सेवा देऊ शकतात. मंदिरांची सर्वंकष माहिती गोळा करणे आणि मंदिरांच्या माहितीचे परस्परात आदान प्रदान करणे हा पण या मागील हेतू आहे. ठिकठिकाणीच्या लहान मोठ्या मंदिरांच्या कामाचा परिचय व्हावा या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा परिचय, मंदिर पर्यटनाला प्रोत्साहन, मंदिर अर्थ व्यवस्थेची माहिती अशी अनेक मुद्दे यात राहतील त्यामुळे मंदिरा संबंधित सर्व प्रकारचे अभ्यासक, लेखक चिंतक, पत्रकार, विश्वस्त, यांच्या लिखाणाचे स्वागत आहे.
संपादक