विद्यार्थ्यांना कृषीचे मूर्त स्वरूप समजावे, संकल्पनांचा बोध व्हावा व कृषीचा विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर ‘कृषी भूगोल’ हा विषय अभ्यासला जातो, स्पर्धा परीक्षांमध्येही त्यास महत्व दिलेले आढळते.
प्रस्तुत ‘कृषी भूगोल’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला वर्गाच्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना छायाचित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कृषी भूगोल हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते.
प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या कृषी भूगोलातील अनमोल कार्यामुळेच कृषीचे भविष्य उज्ज्वल आहे.
धन्यवाद!!!!
Agricultural Geography