‘प्राकृतिक भूगोल’ हा विषय संपूर्ण जगात विविध स्तरांवर अभ्यासला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यास महत्व दिलेले आढळते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्येही पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पृथ्वीचे स्वरूप समजावे, नैसर्गिक संकल्पनांचा बोध व्हावा व भूगोलाशास्त्राचा विकास व्हावा या हेतूने ‘प्राकृतिक भूगोल’ हा विषय समाविष्ट केला गेलेला आहे.
प्रस्तुत ‘प्राकृतिक भूगोल’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या प्रथम वर्ष कला वर्गाच्या प्रथम सत्राच्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना रंगीत छायाचित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ‘प्राकृतिक भूगोल’ हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते.
प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या या भूगोलशास्त्रातील अनमोल कार्यामुळेच भूगोलशास्त्राचे भविष्य उज्ज्वल आहे.
धन्यवाद!!!!
Associate Professor of Geography,
Department of Geography, SSGM College, Kopargaon
Dist. Ahmadnagar, State-Maharashtra, INDIA