Edison (Marathi): Adrushya Niyamancha Dnyata

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4,1
38 відгуків
Електронна книга
160
Сторінки
Google не перевіряє оцінки й відгуки. Докладніше.

Про цю електронну книгу

आंतरिक क्षमतेचा दिवा प्रज्वलित करा

प्रस्तुत पुस्तक म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचं केवळ जीवन चरित्र नाही. तर यात अशा एका मनुष्याचं चित्रण आहे, ज्यानं स्वतःच्या आंतरिक क्षमतेचा शोध घेतला आणि त्या प्रकाशात आणल्या. प्रस्तुत पुस्तकात एडिसन यांना सफल बनवणाऱ्या कारणांवरच केवळ भर देण्यात आलेला नसून त्यांच्या जीवनातील अनेक घटनांच्या माध्यमातून, त्यांच्या चारित्र्याची वैशिष्ट्यंही शब्दबद्ध करण्यात आली आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बोलू न शकणारा मुलगा पुढे औद्योगिक क्रांतीचा मार्गदर्शक कसा बनला? यामागील अदृश्य नियम प्रस्तुत पुस्तकात समजून सांगण्यात आले आहेत.
 

- अपयशाच्या अंधारात यशाचा शोध कसा घ्याल
- संधी शोधण्यासाठी दृष्टिकोनाचं महत्त्व
- सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महान कार्य करण्याचं धाडस
- केवळ स्वतःचा विचार न करता “अव्यक्तिगत दृष्टिकोन’ बाळगण्याचं महत्त्व
- अशक्य वाटणारं कार्य “सहजशक्य’ करण्याची हातोटी
- हजारवेळा अपयश आल्यानंतरही न डगमगता कार्यरत राहण्याचं रहस्य
- प्रत्येक घटनेत वेगळा विचार करण्याची कला
- स्वतःमधील अगणित शक्यता आणि अमर्याद ऊर्जा यांची ओळख

Оцінки та відгуки

4,1
38 відгуків

Про автора

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Оцініть цю електронну книгу

Повідомте нас про свої враження.

Як читати

Смартфони та планшети
Установіть додаток Google Play Книги для Android і iPad або iPhone. Він автоматично синхронізується з вашим обліковим записом і дає змогу читати книги в режимах онлайн і офлайн, де б ви не були.
Портативні та настільні комп’ютери
Ви можете слухати аудіокниги, куплені в Google Play, у веб-переглядачі на комп’ютері.
eReader та інші пристрої
Щоб користуватися пристроями для читання електронних книг із технологією E-ink, наприклад Kobo, вам знадобиться завантажити файл і перенести його на відповідний пристрій. Докладні вказівки з перенесення файлів на підтримувані пристрої можна знайти в Довідковому центрі.