पाटलांच्या कथेतील एक स्वर दु:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणाऱ्या विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल.