अंतर्मनाची शक्ती वापरून समृद्ध, श्रीमंत होण्याचं गुपित या पुस्तकातून तुम्ही जाणाल. प्रत्येक गोष्टीची निर्मिती प्रथमतः आपल्या अंतर्मनातच होते, हाच मूलमंत्र लेखक आपल्याला या पुस्तकात देतात. श्रीमंत होण्यासाठी आवश्यक गोष्टी आधीपासूनच तुमच्या अंतर्मनात आहेत. ज्याचं अंतर्मन समृद्ध, तो बाह्यजगातही श्रीमंतीचा अनुभव घेतो हेच या पुस्तकाचं सार आहे. पैशांविषयी नकारात्मक विचार मनातून हद्दपार करून सकारात्मक भाव निर्माण करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच फायदेशीर ठरेल.