KABANDH

· MEHTA PUBLISHING HOUSE
४.२
१८ परीक्षण
ई-पुस्तक
160
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

रहस्याबरोबरच मनात भयाची आवर्त निर्माण करणाऱ्या मतकरींच्या खास गूढकथा आता नव्या स्वरूपात

गूढकथा म्हणजे काय? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळया गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले, परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्ति-चित्रण, मनाची पकड घेणाऱ्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण-निर्मिती, या साऱ्यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणाऱ्याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल एवढी खात्री नक्कीच आहे. 

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.२
१८ परीक्षणे

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.