‘सर्वसामान्य माणूस आनंदाच्या अनुभवाचा भुकेला असतो. कामवासनापूर्तीच्या अत्युच्च क्षणी या आनंदाचा त्याला, ओझरता का होईना, पण स्पर्श होतो. सर्वसामान्य माणसाला कामवासनपूर्तीतून मिळणाNया आनंदाइतक्या सर्वोच्च आनंदाचा अनुभव अन्य कोणत्याही मार्गाने मिळत नसल्याने माणूस वारंवार त्या आनंदासाठी धडपडत असतो. संभोगात समर्पण तादात्म्य आणि, काही काळ का होईना, पण एक चिंतामुक्त, विचारशून्य अवस्था अनुभवता येते.या अनुभवाचा माणूस भुकेला असतो. कामवासनेकडे म्हणून तो वारंवार आकर्षित होतो. हा अनुभव देणारे माध्यम असणारी व्यक्ती मग त्याची सर्वाधिक प्रिय व्यक्ती ठरते. त्याचे प्रेम त्या व्यक्तीच्या ठिकाणी वेंâद्रित होते, त्याच्या भावविश्वावर त्या व्यक्तीचा अंमल चालू शकतो...’