मिर्झा गालिब म्हणजे उर्दु शायरीतलं अजरामर नाव. मानवी भावभावनांना शब्दांचं कोंदण देणारा हा खरा युगकवी. त्याच्या कवितेइतकंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड शायरीच्या चाहत्यांवर शेकडो वर्षे कायम आहे. शब्दांच्या श्रीमंतीसारखीच खानदानी श्रीमंतीही असलेला हा अवलिया, पण त्याच्या आयुष्यानं अशी वळणं घेतली की ती ही त्याच्या कवितेसारखीच भावविभोर ठरली. अशाच त्याच्या जीवनप्रवासातल्या खाचखळग्यांचा हा अनोखा प्रवास. स्वतः गालिबने जसा सांगितला असता, तसाच.
THE AUTHOR IS A LAWYER BY PROFESSION AND HAS BEEN WRITING IN URDU FOR THE LAST THIRTY YEARS. ONE OF HIS BOOKS ‘CHUN WA CHARA’ HAS WON MAHARASHTRA STATE URDU SAHITYA AKADEMI AND UTTAR PRADESH URDU SAHITYA AKADEMI AWARDS. IN THE PRESENT BOOK, THE AUTHOR PRESENTS THE LIFE STORY OF GHALIB IN A SPECIFIC STYLE, WHILE READING THE BOOK, THE READER FEELS AS IF GHALIB IS SITTING ON A CHAIR IN FRONT OF THEM AND NARRATING HIS STORY.
व्यवसायाने वकील असणारे नांदेडस्थित लेखक शेख शब्बीर हे शब्बीर रोमानी या नावाने लिहितात. मागील पंचवीस वर्षांपासून, उर्दू भाषेमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. भारतातल्या निरनिराळ्या प्रसिद्ध उर्दू मासिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. २०१८ मध्ये त्यांचे उर्दू भाषेतील पुस्तक चुंव चरा ला महाराष्ट्र साहित्य अकादमी व उत्तरप्रदेश साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. मी गालिब बोलतोय हे त्यांचे पहिले मराठी पुस्तक.